Uncategorized

पक्षाच्या बळकटीसाठी राजेंद्र मस्केंकडून तगडे नियोजन, पंकजाताईंची मस्केंच्या पाठीवर कौतूकाची थाप


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : ‘शब्बास राजेंद्र’, अशा शब्दात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कौतूकाची थाप टाकली आहे. पक्षाच्या बळकटीकरणासाठी राजेंद्र मस्के नेहमीच योग्य नियोजन करतात, त्यांच्या याच नियोजनाचे पंकजाताईंनी भरभरून कौतूक केले आहे.
पडत्या काळात जो सोबत असतो तो कधीच नेतृत्वाच्या नजरेआड जात नाही, सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केही मुंडे भगिणींसोबत खंबीरपणे उभे आहेत. मुंडे भगिणींनी दिलेल्या आदेशाचे पालन करून ते जनतेच्या अडचणींना सातत्याने धावून जातात, जनहिताच्या कामाबरोबरच मस्के भाजपला तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून तो यशस्वी करून दाखवितात, सोमवारी येथील मॉ वैष्णव पॅलेसमध्ये  भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पक्षाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीचे नियोजन मस्केंनी अत्यंत चांगल्या पध्दतीने केले होते, त्यावर पंकजाताई खुश झाल्या आहेत. त्यामुळे ‘शब्बास राजेंद्र, तुम्ही बैठकीचे नियोजन खुपच चांगले केलेे त्याबद्दल तुम्हाला सलाम’ अशा शब्दात पंकजाताईंनी राजेंद्र मस्केंच्या कामाचे भरभरून कौतूक केले आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!