बीड (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील अबॅकस स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप 18 जुलै 2021 रोजी झाली. यामध्ये एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. यात बीडच्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट क्रमांक मिळविले आहेत.
तसेच दि. 27 जुलै 2021 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिशय मानद मास्टर अबॅकस पदवी संचिता विलास पिंगळे अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए, कार्यक्रमाचे प्रमुख शिंदे वैभव, प्रमुख अतिथी श्री भगिनी मुकुंद , संचिता यांच्या आई वडील यांच्या समोर बहाल करण्यात आलेली आहे. प्रथम लेबल पासूनच संचिता पिंगळे ही सतत प्रथम क्रमांकाने यश मिळवता आलेली आहे, तिच्या या मास्टर अबॅकस पदवीच्या यशामध्ये आई-वडील आणि तिला शिकवत असलेले सर्व शिक्षक ज्येष्ठ यांचा सिंहाचा वाटा आहे असे तिने सांगितलेले असून कृष्ण विलास पिंगळे हा सुद्धा त्याच्या तिसर्या लेबलमध्ये सर्वोत्कृष्ट यश प्राप्त केलेला आहे. समाजातील सर्व स्तरांमधून संचिता आणि कृष्णा यास अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत तसेच वैष्णवी चौधरी, कार्तिकी बेद्रे, अक्षरा दराडे, अनुष्का दराडे, आर्यन घरघेणे यांचीसुद्धा त्यांनी मिळवलेल्या यशा मध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप करीता वरिल सर्व विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितर एस. ए. घोडके यांनी सांगितले.
चौकट
व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अबॅकस पध्दत फार उपयुक्त असून जो विद्यार्थी अबॅकसच्या लेव्हल करतो, त्यास जीवनातील मोठ्या संकटांना तोंड देण्याची सवय लागते असे अबॅकस मास्टर ट्रेनर एस. ए. घोडके यांनी सांगितले.