Uncategorized

थोडाही राजकीय रंग न देता सर्वांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा,खासदार प्रीतमताईंची संसदेत मागणी



दिल्ली, 11 : मराठा आरक्षणाचा प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, ज्या समाजाने आंदोलने कशी करावी याचा आदर्श पायंडा निर्माण केला, ते आंदोलन प्रश्न सुटत नसल्यामुळे
पुन्हा आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे थोडाही राजकीय रंग न देता सर्वांनी एकत्र येऊन तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, वास्तविकता राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने प्रभावी भूमिका मांडली म्ह्णून मराठा आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरले होते, आता या आरक्षणावर गदा आल्यामुळे पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला आहे, आपवादात्मक ज्या राज्यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची सोय आहे, त्या बाबींचा पूर्ण अभ्यास करून राज्य सरकारने त्या पद्धतीने घटना पिठासमोर प्रभावी भूमिका मांडावी, तोपर्यंत धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजालाही सरकारने सर्व सुविधा द्याव्यात, हे करत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी खा. प्रीतमताईंनी बुधवारी संसदेत केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!