बीड

अंबाजोगाई आणि केजमधील 15 साठवण तलावांना तात्काळ मंजूरी द्या, पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आ. नमिता मुंदडांची जलसंपदा मंत्री जयंत पाटलांकडे मागणी,वाण नदीवर बँरेजेस बांधण्यासाठीही पाठविले पत्र


केज, दि. 12 (लोकाशा न्यूज) : पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आ. नमिता मुंदडांनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगानेच त्यांनी अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील 15 साठवण तलावांना तात्काळ मंजूरी द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
अंबाजोगाई व केज तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी साठवण तलाव होऊ शकतात, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याठिकाणी साठवण तलाव होण्यासारख्या साईट्सही आहेत, विशेष म्हणजे या दोन्ही र् तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसतोड कामगार आहेत. गावच्या गावे उस तोडणीसाठी जातात. या सर्व भागामध्ये पिण्यासाठी पाणी नसते व शेतीलाही पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे अशा ठिकाणी साठवण तलावांना पाणी उपलब्ध करून देऊन साठवण तलावांना मंजुरी देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याअनुषंगानेच अंबाजोगाई तालुक्यातील बुट्टेनाथ,कुरणवाडी, धावडी, वरवटी, साकुड, राक्षसवाडी, मांडवा तांडा, चिंचखंडी, ममदापुर (परळी) तसेच केज तालुक्यातील कोरड्याचीवाडी, घाटेवाडी, कचारवाडी, बेंगाळवाडी, बुरंडवाडी आणि देवगाव येथील साठवण तलावाला साठवण तलावांना पाणी उपलब्ध करून मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. नमिता मुंदडांनी ना. जयंत पाटलांकडे केली आहे.

वाण नदीवर तात्काळ बँरेजेसही बांधा
अंबाजोगाई तालुक्यातून वाण नदी वाहते, ही नदी डोंगरातून वाहते. चिचखंडी ते मांडवा पठाण ते नागापूर या वाण नदीमार्गावर बँरेजेसही बांधणे अत्यंत आवश्यक आहे. हा सर्व भाग डोंगरी आहे. या परिसरातील गावच्या गावे ऊस तोडायला जातात. या परिसरात वाण नदी वाहत असतानाही शेतीला पाणी नाही. शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे सदर परिसरात बँरेजेसही काम झाल्यास शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व उसतोड मजूर ऊसतोडनीला न जाता शेतीकडे वळेल, तरी अंबाजोगाई तालुक्यातील वाण नदीवर बँरेजेसही बांधण्यासाठी त्वरित सर्वे करण्याचे आदेश द्यावेत व मंजुरी द्यावी, अशीही मागणी आ. मुंदडांनी ना. जयंत पाटलांकडे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!