बीड

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याला तात्काळ मदत द्या, आ. नमिता मुंदडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, ताई म्हणाल्या, बिबट्यालाही पकडून नागरिकांमधील भिती दुर करा


  • बीड, दि. 11 : कळसंबर, जैताळवाडी, नेकनूर (ता . जि. बीड) परिसरामध्ये बिबट्या असल्याचे परिसरातील शेतकर्‍यांना दिसून आले आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील बिबट्यास पकडण्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लावणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आजीनाथ वाघमारे, रा . कळसंबर हे जखमी झाले आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना आर्थिक मदत द्यावी व बिबट्यास पकडण्यासाठी सापळा व वनविभागाची पूर्ण यंत्रणा लावण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी एका पत्राव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!