बीड

राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी केलेली तपासणी थातुर-मातुर,अभियांत्रिकी महाविद्यालय मार्फत तपासणीसाठी न्यायालयात जाणार- गंगाधर घुमरे

बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील उमरद- नागापूर ब-हाणपुर – आंबेसावळी – मन्यारवाडी – ढेकणमोहा या मार्गाचे काम बोगस झाले असून शुक्रवारी राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी या कामाच्या तपासणीचा केवळ फार्स केला आहे. आम्ही सुरुवाती पासूनच आमचा या समितीवर विश्वास नाही असे सांगत आहोत. म्हणूनच या कामाची अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) यांच्यामार्फत तपासणी व्हावी यासाठी प्रसंगी मा. उच्च न्यायालयात जाणार असल्याचे गंगाधर घुमरे यांनी म्हटले आहे.

बीड तालुक्यातील उमरद – ब-हाणपुर व आंबेसावळी – ढेकनमोहा या रस्त्याच्या कामाबाबत राष्ट्रवादीचे नेते गंगाधर घुमरे यांनी तक्रारी केल्या होत्या यावर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे आदेश दिले होते मात्र ग्रामीण रस्ते विकास विभागाने तपासणीसाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकांना पाठविले या समितीने तपासणी चा केवळ फार्स केला असल्याचे गंगाधर घुमरे यांनी म्हटले आहे.
सदर रस्त्याची तपासणी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या संस्थेमार्फत होणे आवश्यक आहे त्याशिवाय वास्तव समोर येणार नाही म्हणून त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणीसाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचे गंगाधर घुमरे यांनी म्हटले आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!