बीड, दि. 21 : केंद्र सरकारच्या नवीन ओबीसी पार्लमेंटरी कमिटीत सदस्य म्हणून खा. प्रीतमताई मुंडे यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून अभिनंदन केले जात आहे.
भारत सरकारने मा. खा.राजेश वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 28 जणांची समिती गठीत केली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांच्याप्रमानेच खा. प्रीतमताईं मुंडे ह्या ही धडाडीने काम करत आहे, सातत्याने संसदेत आवाज उठवून त्यांनी ओबीसीबरोबरच इतर समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे, त्यांच्या याच कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांची या कमिटीमध्ये निवड केली आहे, या निवडीबद्दल त्यांचे बीड जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून अभिनंदन केले जात आहे.