अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीचे दिल्ली एम्सने खंडन केले आहे. एम्सने सांगितले आहे की, तो अद्याप जिवंत आहे आणि त्याच्या कोरोना संसर्गावर उपचार सुरु आहे. खरं तर, एम्समध्ये दाखल असलेल्या छोटा राजनचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला. त्यानंतर एम्सला एका निवेदनाद्वारे स्थिती स्पष्ट करावी लागली.
राजनला तिहारच्या उच्च सुरक्षा तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्याला तुरुंगातच कोरोना झाला होता. सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती खालावल्यानंतर 25 एप्रिल रोजी राजनला एम्समध्ये हलवण्यात आले. 27 वर्षांपासून फरार असलेल्या छोटा राजनला नोव्हेंबर 2015 मध्ये इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले.