बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी 28 एप्रिल रोजी राज्यातील 539 पीएसआय दर्जाच्या अधिकार्यांना एपीआय म्हणून पद्दोन्नती दिली आहे. बीड जिल्ह्यात सध्या कर्तव्य बजावत असलेल्या चार अधिकार्यांचा यात समावेश आहे. लालासाहेब राजाराम कांबळे, अमन भिमराव सिरसाठ, सोमनाथ द्रोणाचार्य नरके आणि जनक बाळाभाऊ पुरी या चार अधिकार्यांना 28 एप्रिल रोजी औरंगाबाद परिक्षेत्रात पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळाल्याबद्दल सदर अधिकार्यांचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, सुनिल लांजेवार, डीवायएसपी भास्कर सावंत, संतोष वाळके यांच्यासह इतर अधिकार्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
error: Content is protected !!