बीड : – श्रीमती सुनिता अंबादास बोराडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कला शाखे अंतर्गत ‘ मराठी ‘ विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे . त्यांनी ‘ महानगरीय कवितांचा चिकित्सक अभ्यास ‘ ( 1980-2010 ) या विषयावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रोफेसर डॉ.सदाशिव सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोधप्रबंध सादर केला . 1980 नंतरच्या महानगरीय कवितांमधून महानगरीय संस्कृतीचा रोगट , भ्रष्ट आणि विनाशकारी स्वरुप वास्त चित्रण तसेच माणसांची दयनीयता , असुरक्षितता , हतबलता आणि अस्तित्त्ववेदना , महानगरीय जीवनमान , व्यथा – वेदना आणि यातून निर्माण होत असलेली बेकारी , भूकेचा प्रश्न यासारखे प्रश्न घेऊन महानगरीय कविता लिहिल्या गेल्या . या प्रेरणेतून त्यांनी या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे . ऑनलाईन मौखिक परीक्षेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर , मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.दासू वैद्य , बाह्य परीक्षक बाबूजी आव्हाड महाविद्यायातील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.भालचंद्र वायकर , मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी सदस्य संध्याताई अभिजीत आवरगावकर , प्रोफेसर डॉ.भारत हंडीबाग , अर्चना दिनेश मुंदडा , राजश्री मोहनराव काळे , वर्षा गिराम , डॉ.केसर मुंडे , राजश्री धांडे,प्रा.पुष्पा जाधव , वनिता विनोद इंगोले , वंदना आसाराम गलधर , रोहिणी योगेश नवले , प्रा.प्रकाश नाईकवाडे , प्रकाश काळे , प्रा.डॉ.रविंद्र ढास , डॉ.सोपान सुरवसे , प्रा.बापू घोक्षे , प्रा.नामदेव शिनगारे , प्रा.रमेश रिंगणे , प्रा.डॉ.ढवळे , प्रा.अंकुश काळे ,डॉ गणेश आडगावकर, प्रा.मोहन काळकुटे , डॉ प्रभाकर येडे ,संतोष सावंत अमरीश गुरखुदे,व समस्त काळे परिवार यांनी श्रीमती सुनिता अंबादास बोराडे ( काळे ) यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . आपला विश्वासू प्रा.डॉ.गणेश आडगावकर प्रति , मा.संपादक साहेब , बीड . वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिध्द करावी ही विनंती .