बीड, दि. 4 :- बीड येथील माऊली हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचार दिले जात आहे. परंतु या रुग्णालयात डॉक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे गोरख शिंदे यांच्या वडिलांचा जीव गेला. या संदर्भात डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टर व इतर कर्मचार्यांचाकडून मयत रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
मयत रुग्णाच्या लेकाने रुग्णालयावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून केली आहे.