बीड

लोढाना अधिकृत उमेदवारी नाही; जयदत्त क्षीरसागरांचा कडवा विरोध ?

लोकाशा न्यूज, दि. 19:- पंकजा मुंडे यांच्या जिल्हा बँकेतील गटात अजून उमेदवाऱ्या निश्चित नाहीत , मतदानाच्या आदल्या दिवशी देखील पैनल ठरलेला दिसत नाही. नागरी सह बँका नागरी सह पतसंस्था आणि पगारदार नोकरांच्या सह पतसंस्था यात सारडा यांनी माघार घेतली ज्यामुळे भाजप प्रणित पैनल चा वरील मतदार संघात उमेदवार कोण असा प्रश्न पडला . बीड मधील अशोक लोढा यांचा अर्ज असल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र बीड विधान सभेतील अनुभव पाहता जयदत्त क्षीरसागर यांनी लोढा यांना जोरदार विरोध केल्याची चर्चा आहे . यामुळे निवडणूक उद्या होत असताना अजून पैनल नाही अशी चर्चा होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!