बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बीड तालुकाध्यक्षपदी महादेव उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, अॅड.डी.बी.बागल यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
बीड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या अनेक दिवसापासून महादेव उबाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किसान सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांच्या खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षाची धुरा देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड तालुकाध्यक्षपदी महादेव उबाळे यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्यांच्या निवडीचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही बीड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी महादेव उबाळे यांच्या तालुकाध्यक्षाची धुरा सोपवून त्यांचे अभिनंदन करून त्यांना जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महादेव उबाळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बीड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.