बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरू ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रूपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली. याबाबत माजलगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच बरोबर गायकवाड यांच्या पंढरपुरमधील घराचीही एसीबीकडून झाडाझडती घेण्यात येत आहे, ज्या ज्या संसायस्पद वस्तु असतील त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत, त्याच बरोबर त्यांचे खातेही सील होणार आहेत. तर प्रकरणाच्या तपासासाठी जालण्याची टीम बीडमद्ये तळ ठोकून आहे.
माजलगावात वाळूच्या अवैध गाड्या चालू ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी 65 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या उपर जावून गायकवाड वाळूची गाडी सुरू होताच ती पकडून पुन्हा तहसिल कार्यालयात आणून लावत व ती सोडविण्यासाठी सुमारे दिड ते दोन लाख रूपयांची मागणी करत. याला कंटाळून तक्रारदाराने जालना एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गायकवाड यांनी गुरूवारी 65 हजार रूपयांची लाच आपल्या चालकामार्फत स्विकारताच चालकास संभाजी चौक येथे रंगेहाथ पकडण्यात आले तर लाचेच्या मागणीची खात्री झाल्यानंतर एसडीएम गायकवाड यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. यावेळी माजलगाव येथील त्यांच्या घराची रात्रीच झाडाझडती घेतली आहे तर सोलापुर एसीबीच्या एका टीमकडून गायकवाड यांच्या पंढरपुरमधील घराचीही झाडाझडती घेण्यात येत आहे, ज्या ज्या संसायस्पद वस्तु असतील त्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत, त्याच बरोबर त्यांचे खातेही सील होणार आहेत. लाच घेतल्या प्रकरणी माजलगाव पोलिस ठण्यात गायकवाड व त्यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.