बीड

15 ते 17 फेब्रुवारीला ठरणार जिल्ह्यातील 129 सरपंच, निवड प्रक्रिया पार पाडा, जिल्हाधिकार्‍यांनी तहसिलदारांना दिले आदेश


बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 129 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकाकरिताची मतदान प्रक्रिया 15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेली आहे. आता निवडूण आलेल्या सदस्यांमधून सरपंच, उपसरपंचांच्या निवडी केल्या जाणार आहेत. सदरील निवडी 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत निवडीची विशेष सभा आयोजित करून सरपंच निवड प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील आकराही तहसिलदारांना मंगळवारी दिले आहेत.
जिल्ह्यात माहे एप्रिल ते डिसेंबर, 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 129 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकाकरीता दि. 15 जानेवारी 2021 मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. व सदर निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांची नावे अधिनियमातील तरतुदीनुसार दि. 29 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 33 मध्ये पंचायतीची मुदत संपल्यानंतर कलम 28 पो.क. ( 1 ) अन्वये जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या तारखेला सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकीची सभा आयोजित करावयाची आहे. तसेच अधिनियमातील कलम 33 पो . क . 2 मध्ये पो . क . (1) अन्वये बोलावण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षस्थान (जिल्हाधिकारी) आदेशाद्वारे याबाबत नियुक्त करील असा अधिकारी स्वीकरील असे स्पष्ट नमुद आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने संबधित तहसिलदारांना पहिल्या सभेची तारीख ग्रामपंचायत निहाय घोषित करण्यासाठी व अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे. संबंधित तहसिदारांनी दि. 15 फेब्रुवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत वरील प्रमाणे प्रथम सभेची तारीख घोषित करून सदर सभेत सरपंच व उपसरपंच निवडणूकीचे कामकाज पार पाडण्याकरीता अध्यासी अधिकारी यांची नियुक्ती करावी, अध्यासी अधिकारी किंवा चिटणीसांनी अशा सभेसाठी सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना 3 पुर्ण दिवस अगोदर नोटीस काढण्याची तरतुद आहे. तरी आपल्या अधिनस्त ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची कार्यवाही होत आहे किंवा कसे याची पडताळणी करण्याबाबतची जबाबदारी याद्वारे संबंधित तहसिलदारांवर सोपविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!