बीड महाराष्ट्र

‘त्या’ तरूणीच्या आत्महत्येस मंत्री जबाबदार; सोशल मिडीयावर चर्चा, काय म्हणतायंत पोलीस प्रशासन…

बीड,दि.9-वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणार्‍या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वानवडी पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद करण्याची केली आहे. दरम्यान संबंधीत तरुणीचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातून तीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले आहे.

मयत मुलगी काही दिवसांपुर्वी तीच्या दोन मित्रांसह सोसायटीमध्ये रहावयास आली होती. तीने वन बीएचके सदनिका भाड्याने घेतली होती. यातील बेडरुम ती वापरत होती. तीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनूसार ती पदवीधारक असून इंग्लिशचा कोर्स करण्यासाठी आली होती
– नम्रता पाटील (पोलीस उपायुक्त ,परिमंडळ 5)

पूजा लहू चव्हाण (वय 22,मुळ रा.बीड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु तिने आत्महत्या का केली अद्याप स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत तरुणीच्या आई-वडिलांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली . तीच्या घरच्यांनी ती एका आजाराने ग्रस्त असल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे सोशल मिडियावर असलेल्या चर्चेप्रमाणे कोणतविरुध्दही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे वानवडी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!