मुंबई, दि.५ (लोकाशा न्यूज) : ”आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.दरम्यान, देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.