महाराष्ट्र

धक्कादायक ! ‘सीरम’मधील आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू


पुणे, 21 जानेवारी : पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटच्या आग दुर्घटनेत सहाव्या मजल्यावर 5 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मयत हे बांधकाम मजूर असल्याची शक्यता आहे. तसंच वेल्डिंग करताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. कोरोनावर लस बनवणार्‍या सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याने खळबळ उडाली. हडपसरजवळील गोपाळ पट्टीत असणार्‍या सिरम प्लांटला ही आग लागली.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. याबाबत त्यांनी आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहितीही दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!