बीड

आ.संदीप क्षीरसागरांनी प्रतिष्ठेची केलेल्या पालवण ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पॅनलचा धुव्वा, राजेंद्र मस्के यांनी बाजी मारली

 बीड प्रतिनिधी

          बीड विधानसभा मतदार संघातील पालवण ग्रामपंचायत निवडणूक आमदाराच्या सक्रीय सहभागामुळे अत्यं त चुरशीची ठरली. नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी पालवण महाविकास आघाडीने पाच जागेवर मताधिक्याने विजय प्राप्त करून महाविकास आघाडीने पालवण ग्रामपंचायतमध्ये दणदणीत विजय मिळवून आमदाराला चपराक दिली आहे.

          पालवण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात गावामध्ये भ्रष्टाचार व गुंडगिरीचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. एकाधिकारशाही व स्वार्थी वृत्तीमुळे बीड शहरालगत असणाऱ्या पालवण गावाला आजही सार्वजनिक पाणी पुरवठा योजना होऊ शकली नाही. पाण्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरून गलीच्छ राजकारण केले गेले. यामुळे सामान्य ग्रामस्थ विकासापासून दूर राहिले. या दडपशाहीला हद्दपार करण्यासाठी राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष भाजपा,भीमराव मस्के,रावसाहेब मस्के, शिवसंग्रामचे बाळासाहेब जटाळ , शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष आशिष मस्के, संजय पवार या प्रतिष्टीत नागरिकांनी पुढाकार घेऊन पालवण महाविकास आघाडीच्या माध्यमातून नऊ जागेवर उमेदवार उभे केले. यापैकी दोन उमेदवार केवळ तांत्रिक बाबीचा आधार घेऊन आमदाराने तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यावर दबाव टाकून दोन उमेदवारांचे अर्ज निघाल्याने आमदाराच्या पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध ठरले. उर्वरित सात ग्रामपंचायत सदस्यांपैकी महाविकास आघाडीच्या मनोज पवार, सौ.विश्रांती सचिन मस्के,सौ.मंदा संदीपान प्रभाळे, सौ.सुवर्णा भास्कर मस्के, स्वप्नील मस्के या पाच सदस्यांना मतदारांनी निवडून दिले. अखेर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची विजयी पताका फडकली. बीडचे आमदार यांनी कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्यापासून गावात दोनवेळा ठाण मांडून बसले. शिवाय काही सुपारी बहाद्दर नेत्यांना गावात सुपारी वाजवण्याची संधी दिली गेली. त्यांच्यामार्फत काही मतदार बांधवांमध्ये कलुषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुजान मतदारांनी कोणत्याही दबाव व अमिषाला बळी न पडता महाविकास आघाडीच्या  उमेदवारांना विजयाचा गुलाल लावण्याची संधी दिली. पालवण ग्रामपंचायत मधील हे परिवर्तन भविष्यात बीड विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणार आहे. पालवण गावातून आमदारांना मताधिक्य देऊनही भ्रष्ट व गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यामागे ताकद उभा करून पालवण मधील सामान्य जनतेचा विश्वासघात केल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली. परिवर्तनाची नांदी म्हणून पालवणमध्ये आमदाराच्या पॅनलचा खऱ्या अर्थाने धुवा उडवला आहे हे निश्चित

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!