बीड

बीडच्या आदित्य मचाले याची भारतीय सैन्य दलात निवड

बीड शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेले रमेश भालचंद्र मचाले यांचा मोठा मुलगा आदित्य रमेश मचाले याची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली. आदित्य रमेश मचाले काल दिनांक 30 /9/ 20 रोजी इंडियन मिलिटरी ऍकॅडमी देहरादून येथे रुजू झाले येथील दीड वर्षाच्या सैनिकी प्रशिक्षणानंतर आदित्य रमेश मचाले भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर रुजू होतील.

बीड शहराचा तसेच बीड जिल्ह्याचा सुपुत्र भूमिपुत्र आदित्य रमेश मचाले यांच्या निवडीबद्दल त्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच डॉ भारतभूषण क्षीरसागर (अध्यक्ष नगरपरिषद ) तसेच क्षीरसागर परिवार मचाले परिवार तसेच मित्र मंडळी यांनी आदित्यचे कौतुक केले अभिनंदन केले. आदित्य चे वडील उद्योजक असून आई ग्रहीणी भाऊ आजी श्रीमति अरुणा मचाले, तसेच दोन काका- काकू भाऊ व बहीण असा मोठा परिवार आहे .बीड शहरातील सर्वांच्या परिचयाचे समाजसेवक उद्योजक बंटी मचाले यांचे ते पुतणे आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!