महाराष्ट्र

आशालता वाबगावकर यांचे निधन; ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील २२ जणांना करोना

सातारा, दि. २२ (लोकाशा न्यूज) : ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर साताऱ्याला आल्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. या मालिकेचं चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होतं. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काही जणांना करोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने सेटवरील सुमारे २२ जणांना करोनाची लागण झाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!