पाटोदा दि.03(लोकाशा न्यूज):- नगर पंचायत च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .कोट्यावधी रुपये खर्चून थातूर मातूर काम करून गुत्तेदार अन अधिकाऱ्यांच चांगभलं करणाऱ्या नगर पंचायत विरोधात ग्रामस्थानी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले .आतातरी प्रशासन याकडे लक्ष देईल का हाच खरा प्रश्न आहे .
हा पाटोदा ते घोलपवस्ती, हनुमान वस्ती मार्गे धनगर जवळका या गावाला जोडणारा रस्ता आहे हा परिसर पाटोदा नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक 6 च्या हद्दीत येतो पाटोदा नगरपंचायतीने विविध कामावर करोडो रुपये खर्च केले परंतु या रस्त्याकडे पाटोदा नगरपंचायत ने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे.
दरवर्षी या रस्त्यावरून अगदी पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं इथपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था होते. इथून बहुसंख्य शाळकरी मुलं वयोवृद्ध माणसं गरोदर माता भगिनी यांना हॉस्पिटलला शाळेत दवाखान्यात या व जावा लागतो किंवा अनेक शेतकरी आहेत त्यांना दूध घालने किंवा इतर शेतीच्या कामासाठी तालुक्याला जावे लागते ते सुद्धा त्यांना जाणे मुश्कील होतं.
अनेकदा बोंबाबोंब केल्यानंतर नगरपंचायत दरवर्षी किरकोळ मुरूम वगैरे टाकून म्हणायला त्याची दुरुस्ती करतात पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते.
याबाबत ग्रामस्थांनी खड्ड्यात गाडून घेऊन सोबत चिखलात बसून आंदोलन केलेले आहे आणि नगरपंचायत ला आठ दिवसापूर्वी एक निवेदन दिले तरी नगरपंचायत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यांना अजूनही घोलप वस्ती ते हनुमान वस्ती या गावाला कनेक्ट व्हायला रस्ताच नाहीये.
तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांची ही अवस्था असेल तर मग इतर गावांचे काय हाल असतील.