बीड,
कोरोनाच्या संकटात प्रत्येक माणसाचा हालबेहाल होत आहे परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन आपली चांगलीच भूमिका पार पाडत आहे प्रत्येक कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या परीने जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत चालु आहे.
आज बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने दाखवून दिले की “हम भी कुछ कम नही” कारण बीड जिल्ह्यातील पहिले कोरोना रुग्णावर सिजर यशस्वी करून बाळ व बाळंतीला सुखरूप केलं. या सिजर कडे सर्वांचे लक्ष वेधले होते कारण हे सिजर सोपे नव्हते एक प्रकारचे चॅलेंज होते परंतु आरोग्य प्रशासनाची हि टिमने चॅलेंज ला खर््या वर उतरून खुप कठोर प्रयत्न करून हे सीझर यशस्वी केेेेले यात डाॅ.संतोष शहाणे,डाॅ.अर्जुन तांदळे, डाॅ.सय्यद शाफे, श्रीमती.जयश्री उबाळे, श्रीमती.वर्षा कुलकर्णी,श्री.सत्तार शेख यांच्या प्रयत्नाने सिझर यशस्वी रित्या पार पडला आहे.असली डॉक्टरांची टिम असल्यावर नक्कीच एक दिवस आपण कोरोना वर मात करू, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी म्हटले आहे.