महाराष्ट्र

घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; मुद्रांक शुल्क कमी करणार

मुंबई : राज्य सरकारने आज घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. राज्य मंत्रीमंडळात मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 डिसेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात 5 टक्क्यांहून 2 टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क कमी करणार आहे. तर 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. रियल इस्टेट मार्केटला चालना देण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
कोविड19 च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. परिणामी राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे तिला चालना देण्यासाठी राज्य सरकारने आज बरेज महत्वाचे निर्णय घेतलेत. याच पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!