महाराष्ट्र

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

मुंबई, दि.26 (लोकाशा न्युज) ः शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!