मुंबई : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकनेत्यांना गर्दीच्या कारणामुळे मुंबईतून बाहेर पडता आले नाही, त्यातच पंकजाताई नेमक्या कधी सक्रिय होणार या बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्या उत्सुकतेचे उत्तर स्वत: पंकजाताईंनीच दिले आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना शुभेच्छा देताना पंकजाताईंनी जनतेपासून कोणीच फार काळ दुर राहू शकत नसते, मी सुध्दा राहू शकत नाही, जनतेच्या स्वास्थ्यासाठी आणि प्रशासनातील काही नियमांमुळे तुमच्यामध्ये येता आले नाही. मात्र पुन्हा पहिल्याच ताकतीने, माझा झंजावात येणार आहे’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काल श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर पंकजाताई राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. त्या म्हणाल्या, की मी ही अत्यंत साध्या पद्धतीनेच गणपतीची स्थापना केली आहे. यावर्षी ढोलताशा आवाज नाही. कोरोनामुळे काही बंधनं आली आहेत. देश आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा अशी मी गणरायाकडे प्रार्थना केली आहे. माझा मुलगा शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे. त्याच्याबरोबर मलाही तेथे जावे लागणार आहे. तेथे गेल्यानंतरही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यासाठी आणखी काही दिवस जातील. मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला मी पुन्हा येणार आहे त्याच झंजावातात. कोरोनाचे संकट गेले की दैनंदिन जीवन पूर्वपदावर येईल असा मला विश्वास आहे. चांगल्या विचाराने केलेले काम कधीही वाया जात नाही. कोरोनाच्या संकटात प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवली. नात्याची किंमत कळली. कोरोनाचे संकट हे दुर्दैव असले तरी काही गोष्टी संकटातही शिकता आल्या. कोरोनामुळे प्रशासनाने घातलेल्या नियमामुळे थोडी दूरी निर्माण झाली होती पण, तीही दूर होईल. लवकरच जनतेच्या भेटीसाठी मी येणार आहे असेही पंकजाताई म्हणाल्या. कोरोनामुळे शिस्त लागली, जबाबदारीचे भान आले. नात्याची किंमत कळली, पैशाची नासधुस न करणे या गोष्टीही कोरोनामुळे शिकता आल्या. कितीतरी वेगवेगळे संस्कार या निमित्ताने झाले. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी कोरोना जीवनदान देत नाही हे ही शिकता आले असेही मुंडे म्हणाल्या. कोरोनामुळे बाहेर जाता येत नसेल तरी सभोवतालच्या लोकांना कशी मदत करतील हे पाहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
खा.प्रीतमताईंच्या कामाचे केले कौतूक
खासदार प्रितमताई मुंडे यांचेही पंकजाताईनी कौतुक केले. त्या एक डॉक्टर आहेत. त्यांना जबाबदारीची जाणीव झाली आहे. त्या कोविड सेंटरला भेट देत आहेत. डॉक्टर म्हणून काम करीत याचा मला अभिमान वाटतो.