बीड

गेवराईत राडा, पवार-पंडितांचे कार्यकर्ते भिडले, चारचाकी फोडली, वातावरण तणावपुर्ण, पोलिसांची मोठी फौज गेवराईत तैनात


गेवराई,
आज बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर नगर पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यानच गेवराईत राडा झाल्याची घटना समोर आली आहे. गेवराईत पवार-पंडितांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. विशेष म्हणजे यावेळी माजी आ. लक्ष्मण पवार, माजी सभापती युध्दजित पंडित आणि जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडितही एकमेकांसमोर आले होते. यावेळी एक चारचाकीही फोडली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गेवराईतील वातावरण सध्या तणावपुर्ण झाले आहे. त्यामुळे गेवराईत पोलिसांची मोठी फौज  तैनात करण्यात आली आहे. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून हा ऐन मतदानादिवशी राडा झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!