बीड

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांना एसपींचा दणका, केज हद्दीत दरोडा टाकुन दहशत निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीवर लावला मोक्का, बीड जिल्ह्यातील पाचव्या गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठा दणका दिला आहे. केज हद्दीत दरोडा टाकून दहशत निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीवरही मोक्का लावण्यात आला आहे. मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली गुन्हेगारांची ही पाचवी टोळी आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मोक्का व एमपीडीए  व कलम 55,56,57 मपोका अन्वये बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोर्‍या, दरोडे, घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलोस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगारावर करडी नजर ठेऊन आहेत. विडा येथील आकाश भास्कर जाधव (वय 26 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी, वॉचमन अवादा कंपणी मस्साजोग) यांनी फिर्याद दिली की, दि.7 एप्रिल 2025 रोजी रोजी सायंकाळी 07.00 वाजता मी सोबत अभिजीत दुनघव असे मौजे विडा शिवारात आवादा कंपनीने कामावर वॉचमन म्हणून काम करत असतांना रात्री, अंदाजे 11.45 वाजेच्या सुमारास तेथे अनोळखी 14 लोक चालत आले त्यावेळेस मी व अभिजीत दुनघव यांनी त्या अनोळखी लोकांना तुमचे इकडे काय काम आहे? असे म्हणताच त्यातील चार लोक आमचे जवळ आले, त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने आम्हांला मारहाण करून जखमी केले. त्यातील चारपैकी दोघे सडपातळ होते व दोघे जाड होते. त्यांनी बाजुला पडलेल्या सतरंजीच्या पट्टीने त्यातील दोन लोकांनी माझे व इतर दोन लोकांनी अभिजीत दुनघव यांचे हात पाय बांधले व इतर 10 लोक हे आवादा कंपनीचे चालु असलेल्या पवनचक्कीच्या पाईपमधुन लोखंडी शिडीवर चढले व जबरदस्तीने खालील वर्णनाचा माल  रोटर केबल 2,00,000 रुपये, स्टार्टन केबल 8,11,000 रुपये 3) अर्थीग केवल 2,76,000 असे एकुण 12,87,000 रूपयांचा माल चोरुन नेला आहे. तरी दि.7 एप्रिल 2025 रोजीचे रात्री 11.45 ते दिनांक 08.04.2025 चे 04.00 वा.सु. यातील अनोळखी 14 चोरट्यांनी विडा शिवारातील थढॠ 48 लोकेशन मधील पवनचक्कीचे काम सुरु असलेल्या ठिकाणी येवून, मला व अभिजीत दुनघव याला लाकडी दंडुक्याचा धाक दाखवून आमचे हात-पाय बांधून लाकडीकाठीने माराहण करुन जखमी करुन वरील वर्णनाचा अंदाजे 12,87,000/-रुपयाचा चोरुन नेला म्हणुन माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे, वगैरे मजकूरा वरुन पो.स्टे. केज गु.र.नं. 145/2025 कलम 310 (2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे तपासात केज/स्थागुशा पोलीसांनी आरोपींचा बारकाईने शोध घेवुन सदर गुन्ह्यातील आरोपी बबन सरदार शिंदे (वय 40 वर्षे रा. नांदुरघाट ता. केज जि. बीड), धनाजी रावजी काळे (वय 23 वर्षे रा. लक्ष्मी पारधी वस्ती तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव), मोहन हरी काळे (वय 30 वर्षे रा. सदर), लालासाहेब सखाराम पवार (वय 26 वर्षे रा. दसमेगांव ता. वाशी जि. धाराशिव) यांना दि. 14 एप्रिल 2025 रोजी अटक केली व त्यांची झउठ घेऊन तपास केला आहे. तसेच गुन्ह्यात इतर 6 आरोपी निष्पन्न झाले असुन ते फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासा दरम्यान अटकेतील आरोपीतांकडून गुन्ह्यातील चोरलेला माल कॉपर वायर व बोलेरो गाडी असा एकुण 9,00,000 रूपयांचा माल जप्त केला आहे. सदर टोळीने आजपर्यंत संघटीतरीत्या बीड व धाराशिव जिल्ह्यातील पो. स्टे. केज, नेकनुर, ढोकी, वाशी हद्दीत एकुण ॥ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, गंभीर दुखापत करणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे केले आहेत. प्रस्तावात एकुण ॥ गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी 9 गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतलेली असून 2 गुन्हा पोलीस तपासावर आहे. सर्व गुन्हे 10 वर्षाच्या आतील असुन 03 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत. सदर टोळीचा टोळी प्रमुख याने स्वतःच्या व टोळीतील इतर सदस्यांच्या आर्थीक फायद्यासाठी सदरचे गुन्हे केल्याचे पोलीस अधीक्षकांच्या चानाक्ष नजरेतुन लपुन राहीले नाही. त्यावरुन बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि वैभव पाटील पो.स्टे. केज यांनी अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व स.पोलीस अधिक्षक केज यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दि.13 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. पोलीस अधिक्षक, श्री नवनीत कॉवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दि.20 मे 2025 रोजी प्रस्ताव आपले शिफारशीसह विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांना सादर केला होता. श्री. मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दि. 29 मे 2025 रोजी नमूद संदर्भीय गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीणा यांच्याकडे  दिला आहे व मोक्का कायद्याचे कलम 3(1)(ळळ),3(2),3(4) समाविष्ट करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन सहायक पोलीस अधीक्षक केज हे सदर गुन्हयांचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत 04 आरोपी अटक असून 06 आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक केज कमलेश मीणा, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, स्थागुशा बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री वैभव पाटील, पोउपनि उमेश निकम, पोअं/संतोष गित्ते, शिवाजी कागदे, सर्व पो. स्टे. केज तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, निलेश ठाकुर, विभीषण चव्हाण स्थागुशा बीड यांनी केली आहे. भविष्यातही शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगार व गुन्हेगारांच्या टोळयावर व कायद्याला न जुमानणार्‍या व्यक्ती विरुध्द तसेच बीड जिल्ह्यात धुमाकुळ घालणार्‍या गुन्हेगारांवर मोक्का व एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनित कॉवत यांनी दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!