मायबाप जनतेने मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे – मराठा आरक्षण समन्वयक ऋषिकेश बेदरे
गेवराई : लोकाशा न्युज
गेवराई विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ऋषिकेश बेदरे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या चळवळीत व समाजकार्यात अग्रेसर आहेत. तर गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून समाजासाठी ते लढा देत आहेत. ते मराठा, मुस्लिम, दलित, धनगर, माळी, कोळी समाजासह सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी सहभागी होतात आणि त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. दरम्यान त्यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे.
गेवराई मतदारसंघात ऋषिकेश बेदरे हे संकटकाळी रात्री-अपरात्री त्यांच्या मदतीला धावून जातात. याच समाजकार्याच्या बळावर ऋषिकेश बेदरे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून आपल्या प्रचारदौऱ्यात मतदारांशी चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तरी संकटकाळी रस्त्यावर येऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी आपल्या घरी राहणेच पसंत करणाऱ्या व संकटकाळी मदतीला धावून न येणाऱ्यांना आता विश्रांतीसाठी कायमचे घरी पाठवा आणि एकमेकांचे सगेसोयरे असणाऱ्या व सत्तेसाठी छुपी युती करणाऱ्यांना राजकारणातून हद्दपार करुन मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे कळकळीचे व नम्र आवाहन अपक्ष उमेदवार तथा मराठा आरक्षण समन्वयक ऋषिकेश बेदरे यांनी केले आहे.