बीड: बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवारांनी या माध्यमातून रमेश आडसकर यांना हाबाडा दिला आहे तर परळीत मराठा कार्ड खेळले गेले आहे. परळी मतदारसंघातून शरद पवार कोणाला उतरविणार याची उत्सुकता होती, ती आता पवारांनी संपविली असून येथून राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. माजलगावात प्रकाश सोळंकेंचा सामना आता शरद पवारांचे उमेदवार म्हणून मोहन जगताप करणार आहेत.