बीड

माधव निर्मळ यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा

धारूर शहरातील माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अजित पवार गट बीड जिल्हा कोषाध्यक्ष सह प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष राजेश चव्हाण यांच्याकडे दिला असून आमदारकी नाकारल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
धारूर येथील उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ हे राष्ट्रवादी पक्षाकडे मागील काही दिवसापासून आमदारकीची उमेदवारी मागत होते मात्र त्यांना उमेदवारी न देता विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी जाहीर होतात निर्मळ यांनी आपल्या बीड जिल्हा कोषाध्यक्ष सह प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे या राजीनामा पत्रात निर्मळ यांनी स्पष्ट केले की, त्यांचे वडील स्व. कै. अंबादासराव निर्मळ यांनी पार्टीच्या स्थापनेपासून पार्टीसाठी काम केले. माधव निर्मळ यांनीही पक्षाचे काम केले त त्यांनी २०२४च्या माजलगांव विधानसभा निवडणुकीसाठी वारंवार उमेदवारी मागितली, परंतु पक्षाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज अपक्ष आमदारकीची उमेदवारी भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!