बीड

पोलीस अधीक्षकांचा जुगाऱ्याना मोठा दणका, अंबाजोगाई ग्रामीणमध्ये मोठी कारवाई, पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करत 23 जणांवर गुन्हे दाखल


बीड, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बीड जिल्ह्यात मोठ्या कारवाया सुरू आहेत, त्यांच्या याच कारवायामुळे काळे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत, असे असतानाही अंबाजोगाई ग्रामीण हद्दीमध्ये जुगार अड्डे सुरू आहेत, याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी एपीआय बाळराजे दराडे आणि एलसीबी पथकाच्या माध्यमातून अंबाजोगाई ग्रामीणमध्ये मोठी कारवाई केली आहे, या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारून तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 23 जुगार्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!