बीड

महायुतीच्या सात नेत्यांना विधान परिषदेची लॉटरी, राज्यपाल नियुक्त सात आमदारांना आज दुपारी बारा वाजता दिली जाणार शपथ


मुंबई, महायुतीच्या सात नेत्यांना विधान परिषदेची लॉटरी लागली आहे राज्यपालांच्या कोट्यातून या नेत्यांना आज दुपारी बारा वाजता आमदारकीची शपथ दिली जाणार आहे. उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या त्या सात नेत्यांना शपथ देणार आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील.विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सदस्यांमध्ये श्रीमती चित्रा किशोर वाघ २) श्री विक्रांत पाटील ३) श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड ४) श्री पंकज छगन भुजबळ ५) श्री इद्रिस इलियास नाईकवाडी ६) श्री हेमंत श्रीराम पाटील ७) डॉ श्रीमती मनीषा कायंदे यांचा समवेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!