बीड

मराठवाड्याच्या राजधानीतील दोन योध्दे, कोरोनाशी करत आहेत दोन हात..!


बीड : बीड जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद महानगर पालिकेचे विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचे काम अत्यंत चोख आणि प्रभावी आहे, त्यांच्या या प्रभावी कामामुळे बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न मार्गी लागलेे, जिल्ह्यातील अनेकांना त्यांना न्याय मिळवून देता आला, यापुर्वी स्वच्छतेच्या बाबतीत तर त्यांनी केलेल्या कार्यातून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेले आहे, अशा लोक उपयोगी कामाची दखल खुद्द शासनाने घेवून त्यांचा सातत्याने गौरवही झालेला आहे. सध्या ते औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. याच ठिकाणी पाण्डेय त्यांच्या पत्नी औरंगाबाद ग्रामीणच्या कर्तव्य दक्ष पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील ह्याही कर्तव्य बजावत आहेत. सध्या कोरोनाने औरंगाबाद शहराला चांगलेच घेरलेले आहे. अशा या संकटात आपला जीव मुठीत घेवून हे दोन्ही योध्दे नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी मराठवाड्याच्या राजधानीत मोठ्या ताकतीने लढा देत आहेत, त्यांच्या या लढ्याला भविष्यात नक्कीच यश मिळणार असल्याचा विश्‍वास स्वातंत्र्यदिनी अनेकांनी बोलून दाखविला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!