बीड : कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सहा शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहे, त्यानुसार बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, माजलगाव आणि केज या शहरातील सर्व बँकांना लॉकडाऊन काळात बँकेचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व बँक अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपले ओळखपत्र जवळ बाळगावे असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रविण धरमकर यांनी केले आहे. तसेच पोस्ट विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांना देखील त्यांचे शासकिय ओळखपत्राआधारे पोस्टाचे दैनंदिन कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व घाऊक व्यापार्यांनाही त्यांचा आलेला माल उतरवून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
error: Content is protected !!