जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे मनाई आदेश
बीड, दि, 16 :- जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यात पोळा हा सण सार्वजनिक उत्सव करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. पोळा हा सण सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास राज्य शासनाने विशेष परवानगी दिली नसल्याने या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 32 अन्वये दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजे पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता कलम 144 (1( (3) लागू करण्यात आले आहे या कालावधीमध्ये सार्वजनिक स्थळी सामान्य नागरिकांसाठी मोठया प्रमाणात जमाव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर संदर्भिय आदेशान्वये यापूर्वी प्रतिबंध केला आहे .