बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : विधान सभा निवडणूकीच्या अनुषंगाने गृह विभागाने बुधवारी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार अविनाश बारगळ आता बीडचे नवे एसपी असणार आहेत. ते यापुर्वी अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. बारगळ यांच्या नियुक्तीने पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश मात्र अद्याप निघालेले नाहीत. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या जागी अविनाश बारगळ अमरावतीवरून येतं आहेत. बारगळ यांची अमरवतीतील कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरलेली होती.नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अजून नियुक्ती मिळालेली नाही. बीडमध्ये नंदकुमार ठाकूर यांनी मागील दोन वर्षाहून अधिक सेवा बजावलेली आहे. बीड जिल्ह्यात त्यांनी अत्यंत चोख पध्दतीने कर्तव्य बजावलेले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेले आहे. त्यामुळे ठाकूर यांनी बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात एक आपुलकीचे घर निर्माण केलेले आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मिनमिळावू असल्यामुळे आणि प्रत्येकाची तक्रार ऐकूण घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. बीड जिल्ह्यात त्यांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश बारगळ बीडला येतं आहेत.बारगळ यांनी अमरवतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावलेली आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक त्यानंतर पोलिस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कामकाज पाहिल्यानंतर अमरावती पोलीस अधिक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अधीक्षक म्हणून गृहविभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती. एकाच शहरात चार वेळा पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. आता ते अमरावतीच्या सीआयडी विभागातून बीडला पोलीस अधिक्षक म्हणून येतं आहेत. एक चांगला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातही ते तेवढ्याच ताकतीने काम करून जिल्ह्यातील नागरिकांची सेवा करतील, असा विश्वास प्रत्येकाला आहे.