बीड

रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी ! लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला खात्यात जमा होणार, बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 लाभार्थ्यांनी महिलांनी दाखल केले अर्ज, त्या अर्जदार महिलांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता तत्काळ करावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच, आता, लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, येत्या 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे, रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.  दरम्यान बीड जिल्ह्यातून आतापर्यंत3 लाख 52 हजार 880 लाभार्थ्यांनी या योजनेसाठी आपले अर्ज दाखल केले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17  ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.  तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये, महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर, नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे.  त्यानुसार बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज दाखल केले असून 94.34 % टक्के अर्जांची छाननी करून मोबाईलव्दारे स्वीकृती संदेश  देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्याची विशेष मोहीम जिल्हयात सुरू असून याअंतर्गत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून 3,32,892 लाभार्थी महिलांच्या अर्जांना स्वीकृती देऊन मोबाईल संदेश पाठविण्यात आलेले असून आजपर्यंत  94.34 टक्के  काम झालेले आहे.  

अनेक महिलांनी अपुर्ण अर्ज दाखल केले
ज्यांचा ऑनलाईन अर्ज भरतांना कागदपत्राच्या बाबतीत  काही त्रुट्या आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाईलवर संदेश जात असून अश्या अर्जदार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत पच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल मधून अर्ज दुरूस्त (एडिट) करून अर्जाची त्रुटी पूर्तता पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

अर्जदार महिलांनी अर्जातील त्रुटींची पुर्तता
तात्काळ करावी – अविनाश पाठक
ज्या महिला अर्जदारांनी अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडलेले आहेत त्यांचे अर्ज स्वीकृती देण्यात येत आहे. व तसा संदेश महिला अर्जदारांच्या मोबाईलवर जात आहे  स्वीकृती असा संदेश आल्यास आपला अर्ज यशस्वीरिता भरला गेला असल्याचे कळते.  तथापि ज्या महिला अर्जदारांना  आपला अर्ज पार्शली रिजेक्टेड असा मोबाईल संदेश आलेला आहे त्यांनी तात्काळ नारी शक्ती दूत पच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल ऍप मधून अर्ज एडिट करून अर्जाची त्रुटी पूर्तता पूर्ण करून घ्यावी,  असे आवाहन, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी  केले आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!