बीड

माजलगाव मतदार संघातील विकास कामांसाठी जयसिंह भैय्या अजित दादांना भेटले, दादा म्हणाले, माजलगाव मतदार संघातील विकास कामांकडे प्राधान्याने लक्ष देणार


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : माजलगाव मतदार संघातील विकास कामांसंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह भैय्या सोळंके यांनी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली, माजलगाव मतदार संघातील विकास कामांककडे प्राधान्याने लक्ष देवू, असा शब्द यावेळी अजित दादांनी जयसिंह भैय्यांना दिला आहे.
जयसिंह सोळंके यांच्या माध्यमातून माजलगाव मतदार संघाला एक खंबीर युवा नेतृत्व भेटलेलं आहे. आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ते चोख पध्दतीने  जनसेवा करत आहेत. विशेष म्हणजे बीड झेडपीचे अर्थ आणि बांधकाम सभापती असताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न सोडविलेले आहेत. जिल्ह्यात, माजलगाव मतदार संघात ज्यांना अडचणी येतील त्यांच्या अडचणीसाठी जयसिंह भैय्या नेहमीच धावून जातात, त्यामुळेच त्यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. नुकतीच त्यांनी माजलगाव मतदार संघातील विकास कामांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईत जावून भेट घेवून त्यांच्याशी सखोल चर्चा केली, अजित दादांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत या कामांबाबत प्राधान्याने लक्ष देईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार जयसिंह भैय्या यांच्या याच कामाचा भविष्यात माजलगाव मतदार संघाला मोठा फायदाच होणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!