बीड

मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजाताई मुंडे साहेबांची लेक, कुठून आली ही तुतारी चल उचलून फेक ; महायुतीच्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार

अंबाजोगाई, ।दिनांक ०७।
महायुतीच्या तळपत्या विजयात विरोधकांची लंका जळून भस्म होणार आहे. 21 व्या शतकातील सक्षम भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघातून आमचे मित्र गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांना विक्रमी मतांनी विजयी करा. बीड जिल्ह्यातून एक इतिहास निर्माण करा. बीडमध्ये येत्या 4 जूनला तुतारी उचलून फेका..तिची पिपाणी झाल्याचे दिसले पाहिजे एवढं मताधिक्य पंकजाताईंना द्या असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बोला परळी वैजनाथ महाराज की जय अशा उद्घोषनेने आपल्या भाषणाची सुरुवात करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले की, राज्यातलं तापमान सध्या 40 च्या पुढे गेलंय आणि चार तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल आणि देशातला 400 पार होणार आहे. महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्य़ात काय होणार ? याची चिंताच नाही. पंकजाताईंचा विक्रमी विजय केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हा संकल्प करा. बीडमधून तुतारीची पिपाणी करा. विकासाची कास धरा.कारण देशांमध्ये एकच गॅरंटी चालते ती म्हणजे मोदी गॅरंटीआणि आता देशातल्या लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणण्याची. त्यामुळे पंकजाताईंची साथ सोडू नका असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदींना उद्देशुन मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आमच्या बीडची जनता निर्मळ मनाची आहे.मनात काहीही खोट नाही.ज्याला स्विकारलं त्याची साथ कधीही सोडत नाही.बीडच्या जनतेने आमचे मुंडेंना सदैव प्रेम दिलं त्यांचा सदैव सन्मान केला.आज तेच प्रेम व साथ पंकजाताईंना ही जनता देत आहे. त्यामुळे पंकजाताईना विजयी करुन विकासाला ही जनता नक्कीच साथ देणार असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजाताईंना मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे.ही निवडणूक पंकजाताईंची किंवा तुमची आमची नाहीये ही निवडणूक देश व महाराष्ट्र घडवणारी आहे. ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.म्हणून येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मराठा समाजाने कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज बांधवांना खास करून आवाहन केले त्यांनी सांगितले की, काही लोक मराठा समाजामध्ये संभ्रम पसरवतात पण आपल्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. कोणत्याही समाजाला धक्का न लावता ते कोर्टात टिकवले. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही परंतु आपण दिल्यानंतर ते कोर्टात जातात. परंतु आपलं सरकार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवणार. कायद्याच्या चौकटीत बसवणार आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं पण काम सुरू केलं.सगेसोयरेचं पण सुरु आहे.ओबीसी समाज व इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे. म्हणून तुम्ही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. तुम्ही कुठेही दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका. अठरापगड जाती धर्माच्या विकासाची गॅरंटी घेणाऱ्या, वंचित उपेक्षित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लोकसभेत विक्रमी मताधिकाने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!