बीड

जिल्ह्याच्या नावाला शोभेल असा विजय पंकजाताईंना मिळेल – खा. प्रितमताई मुंडे, बीड मतदार संघातून पंकजाताईंना मताधिक्य देणार  – राजेंद्र मस्के

( बीड प्रतिनिधी )

विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विकासासाठी सातत्याने काम करावे लागते. जिल्ह्याचा विकास करण्याची नियत आणि क्षमता पंकजाताईकडे आहे. विरोधकांचे खोटे नाटे आरोप ऐकून घेऊ नका. जिह्याच्या विकासासाठी पंकजाताईंची गरज आहे. भाजपा व शिवसेना एकत्र नांदणार हा नैसर्गिक नियम. आज राष्ट्रवादीही आपल्या सोबत आहे. हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. भाजपासह महायुतीतील सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत ठेवला तर, ताईंना शोभेल असा विजय निश्चित होईल. असा विश्वास खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी मांजरसुंबा येथील कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला.  

आज मांजरसुंबा येथे भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ लिंबागणेश व मांजरसुंबा पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक खा. डॉ. प्रितमताई मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जि.प. सदस्य भारत काळे, गोरख दादा रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीस, चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगोजे, सुनील सुरवसे, बद्रीनाथ जटाळ, गणेश वाणी, दादासाहेब खिल्लारे, सरपंच बाळासाहेब वायभट, पांडुरंग कानडे, उद्धव जाधव, कागदे गुरुजी, किशोर शेळके, अश्विन शेळके, अशोक रसाळ, प्रदीप चौरे, लाला पाटील चौरे, श्रीमंत जायभाय, महादेव खोसे, दीपकराव काळे माजी संचालक मार्केट कमिटी बीड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीस मार्गदर्शन करताना राजेंद्र मस्के म्हणाले की, मोदी सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या. ग्रामीण विकासाला चालना मिळाली. शेतकरी, कामगार, मजूर, महिला यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या. प्रत्येक घटकांपर्यंत विकासाचा लाभ पोहचला. आगामी काळात बीड जिल्ह्यात विकास कामे खेचून आणण्यासाठी मतदार बांधव पंकजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बीड विधानसभा मतदार संघातील भाजपा व महायुतीचा कार्यकर्ता बुथ स्तरापासून अथक परिश्रम घेत आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदार बांधवांचा पाठींबा बीड मधून मताधिक्य देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!