बीड

बीडमधील विशाल साडी सेंटर फोडले, साडेचार लाख रुपयांची रोकड पळविली

बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

बीड शहरातील सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार लाख रुपयांवर हात साफ केला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट दिली.नेमकी एवढी मोठी रोख रक्कम दुकानात कसकाय होती,रोख रक्कम दुकानात का ठेवली असे प्रश्न पोलिसांसमोर पडले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!