बीड, आयपीएस पंकज कुमावत यांनी आपल्या कर्तव्य दक्ष पानातून जिल्ह्यात मोठा दबदबा निर्माण केलेला आहे, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कारवयांमुळे अवैध धंद्यांवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. मागच्या दोन दिवसापूर्वीच त्यांची अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तसा आदेश ही काढण्यात आला होता, मात्र त्यांच्या या नियुक्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्याच्या आस्थापना विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी एक पत्र काढले आहे, कुमावत हे वगळता इतर अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे असे या पत्रात म्हंटले आहे, वास्तविक पाहता कुमावत यांचे काम खरोखरच चांगले आणि गरिबांना न्याय देणारे आहे, त्यामुळे त्यांच्या सारख्या चांगल्या अधिकाऱ्याला गृह विभागाने काम करू द्यावे, त्यांच्या नियुक्तीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी संपूर्ण बीडकरांमधून केली जात आहे.















