बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीस अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याकडे 14 चोरीच्या दुचाकी आढळून आला. या दुचाकी बीडसह परजिल्ह्यातून चोरी केल्याचे समोर आले आहे.
समित उर्फ भैय्या सुभाष खेत्रे (वय 30 रा.वाहेगाव आमला, ता.गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. याने नगर रोडवरुन एक दुचाकी चोरी केलेली असून सध्या तो जातेगाव शिवारात असल्याची पोलीसांना माहिती मिळाली. जातेगाव येथून दुचाकीसह त्यास ताब्यात घेतले. त्याने नगर रोडवरील राजमुद्रा हॉटेल परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता अहमदनगर, संभाजीनगर, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यातून एकूण 13 दुचाकी केशव विश्वनाथ जाधव (रा.मालेगाव जहाँगीर जि.वाशीम) याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. तसेच या सर्व दुचाकी विक्री करण्यासाठी घरासमोर ठेवल्याचे सांगितले. त्यावरुन एकूण 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, कैलास ठोंबरे, शेख नसीर, मच्छिंद्र बीडकर, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भगवात शेलार, विक्की सुरवसे, बप्पासाहेब घोडके, व चालक गणेश मराडे यांनी केली.