बीड

जिल्ह्यातील 5020 महिलांच्या खात्यात सप्टेंबरचे एक कोटी 30 लाखाचे मानधन जमा, सीईओ अविनाश पाठक यांनी शालेय पोषण आहार कामगार महिलांना दिली गोरी-गणपतीची भेट


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : हातात घेतलेले काम तात्काळ आणि गतीने मार्गी लावायचे हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून सीईओ अविनाश पाठक हे काम करीत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील अनेकांना न्याय मिळत आहे. काल जिल्ह्यातील 5020 शालेय पोषण आहार कामगारांच्या (महिलांच्या) खात्यात त्यांनी एक कोटी 30 लाख 70 हजार रूपये वर्ग केले आहेत. चालू असलेल्या सप्टेंबर महिण्याचे हे मानधन असून गोरी-गणपती या सणानिमित्त त्यांनी ही भेट दिली आहे. याबद्दल सीईओंचे जिल्ह्यातील कामगारांमधून आभार मानले जात आहेत.
अविनाश पाठक हे बीड जिल्ह्यात सीईओ म्हणून नुकतेच रूजू झाले असले तरी त्यांना बीड जिल्ह्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नेमके काय काय करायचे हे त्यांनी ठरविलेले आहे. त्यामुळेच त्यांचा पुर्ण कार्यकाळ बीड जिल्ह्यासाठी फायद्याचाच ठरणार आहे. मागच्या महिण्यातही शालेय पोषण आहार कामगारांचे ऑगस्ट महिण्याचे मानधन महिणा संपण्याच्या दोन दिवस आधीच त्यांच्या खात्यावर टाकून त्यांना मोठा आधार देण्याचे काम त्यांनी केले होते, महिलांसाठी ही रक्षाबंधनाची भेट होती, मागच्या दोन दिवसांपासून गणपतीचे आगमन झाले आहे तर आज दि. 21 सप्टेंबरपासून महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. याच अनुषंगाने या चालु महिण्याचे एक कोटी 30 लाख 70 हजार रूपये खात्यात टाकून जिल्ह्यातील 5020 महिला कामगारांना गोरी-गणपतीची सीईओंनी भेट दिली आहे. याबद्दल सीईओ अविनाश पाठक, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, लेखाधिकारी हरिदास धांडे आणि महेश थिगळे यांचे आभार मानले जात आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!