बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : आयुष्यमान भव मोहीम दि.17 सप्टेंबर 2023 ते दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मध्ये आयुष्यमान आपल्या दारी 3.0, स्वच्छता अभियान,आयुष्यमान मेळावा,रक्तदान मोहीम ,अवयवदान जनजागृती मोहीम, वय वर्ष 18 वरील सर्व पुरुषांचे आरोग्य तपासणी मोहीम,आयुष्यमान सभा ,अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
आयुष्यमान भव: मोहिमेचे उद्घाटन बुधवारी दुपारी बारा वाजता राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सच्यां माध्यमातून भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थित राष्ट्रीय उद्घाटन सोहळा पार पडला. आयुष्मान सभेच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.रमेशजी बैस, मा.मुख्यमंत्री, मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, व आरोग्य मंत्री, मा.ना.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थित राज्य स्तरीय उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला. जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय बीड येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश पाठक साहेब यांच्या हस्ते आयुष्यमान भव: मोहिमेचे उदघाटन करण्यात आले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख साहेब ,माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय कदम,जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री महेश माने व निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क)डॉ.एल.आर.तांदळे साहेब व इतर जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी उपस्थितीतांनी अवयव दान प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते टीबी निक्षय मित्र यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बीड जिल्ह्यात सध्या 11 सप्टेंबर 2023 ते17 सप्टेंबर 2023 या कालावधीत झरींळशपीं डरषशींू ुशशज्ञ साजरा केला जात आहे .दि.17 सप्टेंबर 2023 ते दि.02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयुष्यमान भव सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. तसेच या कालावधीत आयुष्यमान आपल्या दारी हि मोहीम राबवली जाणार असून या मोहिमेच्या उद्देश हा आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण करणे हा आहे.याच कालवधीमध्ये स्वच्छ आरोग्यसंस्था ,शाळा व महाविद्यालय येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर 4 प्रकारच्या मेळावेचे आयोजन करण्यात आले आहे.
1) पहिला आठवडा -संसर्ग जन्य आजारसेवा ,तपासणी,निदान,उपचार
2) दुसरा आठवडा -क्षयरोग,कृष्टरोग व इतर संसर्ग जन्य आजारसेवा
3) तिसरा आठवडा -माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा
4) चौथा आठवडा -सिकलसेल तपासणी नेत्ररोग चिकित्सा व
कान,नाक,घसा तपासणी दि. 17 सप्टेंबर 2023 ते दि.02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अवयव दान प्रतिज्ञा या याबाबत प्रसिद्धी आणि अवयव दानाची इच्छा
असणार्यांची वेबसाईट वर नोंदणी या बाबत कार्यवाही येणार आहे.
या मोहिमेदरम्यान अंगणवाडी मधील मुला-मुलींची व प्राथमिक शाळेच्या
मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.या दरम्यान दि.02
ऑक्टोबर 2023 रोजी गावपातळीवर आयुष्यमान सभा आयोजित करण्यात
येणार आहे. दरम्यान ही मोहिम जिल्ह्यात गतीने राबविण्यासाठी सीईओ अविनाश पाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्लास गंडाळ, सीएस नागेश चव्हाण आणि डॉ. संजय कदम यांनी आपली यंत्रणा गतीमान केली आहे.
—















