बीड

कापसात गांज्याची शेती, 27 लाखाचा गांजा जप्त,  पंकज कुमावतांची छापेमारी,चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : शिरुर तालुक्यातल्या घोगस पारगाव येथे एका शेतकर्‍याने गांज्याची झाडे लावली. सदरील या गांज्याच्या झाडाची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पंकज कुमावत यांनी त्या ठिकाणी धाड टाकून 27 लाखाचा गांजा जप्त केला. संभाजी हरिभाऊ कराड (वय 37 वर्षे) याने आपल्या शेतात गांजाच्या झाडे लावली. याची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पंकज कुमावत यांनी या ठिकाणी धाड टाकून 554 किलो ग्रॉम कांजा ज्याची किंमत 27 लाख 27 हजार 700 रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबद अधिक माहिती अशी की, दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सहा. पोलीस अधिक्षक केज, श्री. पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे ईसम नामे संभाजी कराड याने त्याचे स्वत:चे मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिर रित्या गांज्याची लागवड केली आहे. त्या अन्वये मा. सहा. पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी सदर बातमीची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत यांनी डीवायएसपी निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक श्‍वेता खाडे, सपोनि नारायण एकशिंगे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे,, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांचे टिमने घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण 554 कि.ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 27,27,700/- ( सत्ताविस लाख सत्ताविस हजार सातशे ) लागवड केलेला मिळुन आल्याने आरोपीस यातील आरोपी नामे संभाजी हरीभाऊ कराड, वय- 37 वर्ष, रा. घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे चकलंबा ता. गेवराई जि.बीड येथे आलोत व पोउपनि राजेश पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री.नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत साहेब सोबत, श्री. निरज राजगुरु साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक श्‍वेता खाडे, सपोनि नारायण एकशिंगे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!