बीड

मनसे कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेत राडा; सीओ आंधरेंच्या केबिनमध्ये तोडफोड: कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन

बीड:- शहरातील विविध प्रश्नाबाबत मनसे कडून दोन दिवसापूर्वी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. मात्र यावर कारवाई न झाल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेत राडा करत सीओ नीता अंधारे यांच्या केबिनमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे नगर पालिका प्रशासन कडून काम बंद आंदोलन करण्यात आले.
शहरातील विविध प्रश्नावर मनसे कडून निवेदन देण्यात आले होते. हे प्रश्न दोन दिवसांत मार्गी लागले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्याच्या निवेदनाप्रमाणे काम झाले नसल्याचे सांगत मनसे च्या काही कार्यकर्त्यांकडून सीओ नीता अंधारे यांच्या केबिनचा दरवाजा व काही खुर्चीची तोडफोड करण्यात आली. प्रशासकीय कामात अडथळा घालत तोडफोड केल्याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!