बीड

पारस ललवाणी यांना मातृशोक

सौ.लिलाबाई ललवाणी यांचे निधन

बीड, दि.3 (लोकाशा न्युज)ः- धार्मिक वृत्ती असलेल्या शांत, सयंमी, मनमिळावू स्वभावाच्या बीड शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी चंदूलालजी ललवाणी यांच्या पत्नी सौ.लिलाबाई चंदूलालजी ललवाणी यांचा र्‍हदविकाराच्या झटक्याने गुरूवार दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी 7.55 मिनीटाने राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 70 वर्षे होते. त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पारस ललवाणी आणि निलेश ललवाणी यांच्या त्या मातोश्री होत्या. बीड शहरातील कोटेचा कॉलनी हॉटेल शांताईच्या पाठीमागे असलेल्या रहत्या घरून सायंकाळी 5 वाजता अत्यंयात्रा निघणार असून अमरधाम स्मशानभुमी येथे अत्यंसंस्कार होणार आहे. ललवाणी कुटूंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!