बीड

डीएचओ डॉ. उल्लास गंडाळ यांनी पदभार स्विकारला



बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी बीडचे भुमिपुत्र डॉ. उल्लास गंडाळ यांची डीएचओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे, यापुर्वी त्यांनी बीड जिल्ह्यात उत्कृष्टरित्या कर्तव्य बजावलेले आहे. त्यांच्या कर्तव्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना फायदा झालेला आहे. ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांच्या याच कर्तव्यदक्षपणाचा पुन्हा बीड जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असा विश्‍वास सर्वांनी आहे, दरम्यान त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले विशेष म्हणजे सर्व तालुका अधिकार्‍यांनी त्यांची भेट घेवूनही त्यांना शुभेच्छा दिल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!